‘हरित नांदेड अभियान २०२६’: वृक्षारोपणासाठी वृक्षमित्र फाउंडेशनचे महापालिका प्रशासनाला निवेदन!

​’हरित नांदेड अभियान २०२६’: वृक्षारोपणासाठी वृक्षमित्र फाउंडेशनचे महापालिका प्रशासनाला निवेदन
​नांदेड: प्रतिनिधी 
नांदेड शहराला अधिक सुंदर आणि हिरवेगार करण्यासाठी ‘वृक्षमित्र फाउंडेशन, नांदेड’ यांच्या वतीने ‘हरित नांदेड अभियान २०२६’ अंतर्गत एका विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेच्या पार्श्वभूमीवर, शहरात २०२६ मध्ये राबविण्यात येणाऱ्या महावृक्षलागवड अभियानाबाबत वृक्षमित्र फाउंडेशनच्या वतीने नांदेड महापालिकेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना व अधिकाऱ्यांना अधिकृत निवेदन सादर करण्यात आले.
​हे निवेदन नांदेड शहराच्या महापौर सौ. कविताताई मुळे, माजी उपमहापौर श्री. सतीश देशमुख सर तसेच माजी आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांना सुपूर्द करण्यात आले.
​व्यापक जनसहभागावर चर्चा
​निवेदन सादर करताना उपस्थितांमध्ये वृक्षसंवर्धन आणि पर्यावरण संरक्षणाविषयी सखोल चर्चा झाली. शहरात केवळ वृक्षलागवड न करता, नागरिकांच्या व्यापक जनसहभागातून ही मोहीम यशस्वी कशी करता येईल आणि लावलेल्या झाडांचे संवर्धन कसे करता येईल, यावर विशेष भर देण्यात आला.
​’एक झाड लावा… भविष्यासाठी हिरवा श्वास जपा!’
​पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ‘एक पाऊल पर्यावरणासाठी… एक पाऊल भविष्यासाठी…’ हा संदेश देत ‘हरित नांदेड… सुंदर नांदेड… आपले नांदेड!’ ही संकल्पना या अभियानातून मांडण्यात आली आहे.
​निवेदक (वृक्षमित्र फाउंडेशन, नांदेड टीम):
या अभियानात पुढाकार घेणारे व निवेदन सादर करणारे प्रमुख सदस्य खालीलप्रमाणे आहेत:
​संतोष मुगटकर सर
​रवि रो. रणखांब सर
​सुधाकर चिरुकला सर, शैलेन्द्र क्षीरसागर
​चैतन्य सर व सितारामजी सोनटक्के योग गरू उपस्थितीत होते. 

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now
               
हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
डाउनलोड करें

जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Related Articles

Back to top button
Close