युगात्मा शरद जोशी यांच्या जयंतीदिनी किनवट तालुक्यात शेतकरी संघटनेची ताकद वाढली; अनेक तरुण व प्रयोगशील शेतकऱ्यांचा प्रवेश!

किनवट (विशेष प्रतिनिधी):
दि. 04

युगात्मा शरद जोशी यांच्या जयंतीचे औचित्य साधून आज, ३ सप्टेंबर २०२६ रोजी किनवट तालुक्यात शेतकरी संघटनेमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्साह पाहायला मिळाला. शेतकरी संघटनेचे नांदेड जिल्हाध्यक्ष रमेश कदम पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत तालुक्यातील तरुण व ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी संघटनेत धडाक्यात प्रवेश केला.
या विशेष प्रसंगी मौजे कोपरा येथील प्रकाश सादलवाड, ऋषिकांत बैलवाड आणि नागेश चंचलवाड या तीन धडपडणाऱ्या तरुणांनी शेतकरी संघटनेचे सभासदत्व स्वीकारले. तसेच मौजे नंदगाव (ता. किनवट) येथील प्रयोगशील शेतकरी तथा माजी सरपंच बालाजीराव पाटील जाधव यांनीही शेतकरी संघटनेत जाहीर प्रवेश केला. प्रयोगशील शेतकरी व स्थानिक नेतृत्वाच्या या प्रवेशामुळे किनवट तालुक्यात शेतकरी संघटना अधिक बळकट झाली आहे.
किनवट तालुक्यातील तरुण वर्ग आणि शेतकरी मोठ्या संख्येने शेतकरी संघटनेकडे आकृष्ट होत असून, शेतकरी हिताच्या लढ्यात सक्रिय सहभाग नोंदवत आहेत.
या प्रवेश सोहळ्याच्या वेळी शेतकरी संघटनेचे नांदेड जिल्हाध्यक्ष रमेश कदम पाटील, पंढरीनाथ भेंडेगावकर, अशोक शेलार, शिवराज मुंडे, बंडू चव्हाण यांच्यासह संघटनेचे अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now
               
हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
डाउनलोड करें

जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Related Articles

Back to top button
Close