के तुकाराम यांची गझल वृत्त सुमंदारमाला

🔴🟠🔴वृत्त_सुमंदारमाला

लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगा

किती प्रश्न मी सोडवू या मनाचे मला उत्तरे भेटली ना बरी

तशा उत्तराच्या अपेक्षेत मी जिथे पाहिजे स्वप्न ती भरजरी

निरागस असा फार नसतो कुणीही फुका दावतो सुज्ञता वरवरी

कधी होत जातो गुन्हा थोडका अन् पुन्हा येत जातोय भानावरी 

जीवाला असे वाटते या कधी आपलेही सुखी घर हवे अंबरी 

तसे होत नाही मनातून असते जशी एक इच्छा खुळी बावरी 

असे वाटते मायबापास त्या कोणताही नको त्रास त्रागा उरी 

कधी थेंब पण आसवांचा नको लेकराच्या उगी गोड गालावरी

पुन्हा जन्म व्हावा पुन्हा बाळ व्हावे नको बाप होणे पुढे या तरी

पिळवणूक होते किती आतड्याची सुलगते किती आग ही अंतरी  

दिगंतात ही दु:ख कसले नसावे नसाव्या कुणा यातना चरचरी

सुखाचा जरा कासरा सैल व्हावा नको कोणत्याही मनी घरघरी

इथे खूप वाईट पडतात फासे मला तूच सांभाळ बा श्रीहरी

अता तर पलट एकदा पान माझे तुझे धाड ना पत्रके लवकरी

तुझी विठ्ठला फक्त सेवा घडावी कुण्या गर्दभाची नको चाकरी 

तुका गात राहीन गाणे तुझे अन् मिळो फक्त पोटास या भाकरी

@K.Tukaram

 

 

                                 

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now
               
हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
डाउनलोड करें

जवाब जरूर दे 

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Back to top button
Close