*ब्रेकिंग न्युज….!* भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी नरेंद्र दादा चव्हाण यांची बिनविरोध निवड…..!

माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यन्वित असलेल्या भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्यांच्या चेअरमनपदी विद्यमान व्हॉ ईस चेअरमन नरेंद्र दादा चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मागील आठवड्यात भाऊराव चव्हाण साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव तिडके यांनी अचानक राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या या जागेवर चेअरमनपदाच्यानिवडीसाठी दि. २५ एप्रिल रोजी भाऊराव चव्हाण साखर कारखाना सभागृहात संचालकांची विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीपुर्वी विद्यमान व्हॉईस चेअरमन नरेंद्र दादा चव्हाण यांनी आपल्या पदाचा राजीनामा देवून चेअरमनपदासाठी अर्ज दाखल केला. नियोजित वेळेत नरेंद्र दादा चव्हाण यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने ठराविक वेळेनंतर निवडणूक प्रक्रिया पुर्ण करून निवडणूक निर्णय अधिकारी विश्वास देशमुख यांनी भाऊराव चव्हाण साखर कारखान्याच्या चेअरमनपदी नरेंद्र चव्हाण यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली. या विशेष बैठकीला संचालक गणपतराव तिडके, अँड. सुभाषराव कल्याणकर, व्यंकटराव साखरे, शिवाजीराव पवार, प्रा. कैलाश दाड, व्यंकटराव कल्याणकर, मोतीराम जगताप, लालजी पाटील कदम, बळवंत पाटील इंगोले, माधवराव शिंदे, बालाजी शिंदे, किशनराव पाटील, दत्तराम आवातिरक, अशोक कदम, माधवराव कल्याणे, आनंदराव सावते, सौ. कमलबाई सुर्यवंशी, सुनंदाबाई मुंगल, सुभाषराव देशमुख, साहेबराव राठोड, श्यामसुंदर पाटील उपस्थित होते.यावेळी माजी मुख्यमंत्री खासदाराव अशोकराव चव्हाण, मनपाचे माजी सभापती किशोर स्वामी, संजयराव देशमुख लहानकर, भाजपा तालुकाध्यक्ष बालाजी पाटील गव्हाणे, उत्तमराव लोमटे, निलेश देशमुख, शिवलिंग स्वामी, राजाराम पवार, चंद्रमणी लोणे, राजू कल्याणकर, मारोतराव तिडके, रावसाहेब जाधव, संभाजी जाधव आदींची उपस्थिती होती.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now
               
हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
डाउनलोड करें

जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Related Articles

Back to top button
Close