PM इंटर्नशिप योजना 2025: नोंदणी, पात्रता, कालावधी आणि मानधन — महत्त्वाचे प्रश्न उत्तरांसह.

PM Internship Scheme 2025 ही योजना देशातील तरुणांना नामांकित 500 कंपन्यांमध्ये इंटर्नशिपची संधी देण्यासाठी सुरु करण्यात आली आहे. या योजनेद्वारे पाच वर्षांमध्ये 1 कोटी तरुणांना इंटर्नशिप दिली जाणार आहे. ऑक्टोबर 3 पासून या योजनेच्या पायलट फेजसाठी कंपन्यांची नोंदणी सुरु झाली होती. आता लवकरच तरुणांसाठी नोंदणी प्रक्रिया सुरु होणार आहे.

फक्त 6% उमेदवारांनी ऑफर स्वीकारली – 1.53 लाख ऑफर्स होत्या

1. PM इंटर्नशिप योजनेची अधिकृत वेबसाइट कोणती आहे?

👉 https://pminternship.mca.gov.in

2. कोणत्या क्षेत्रांमध्ये इंटर्नशिप मिळेल?

तुम्ही खालील क्षेत्रांमध्ये इंटर्नशिपसाठी अर्ज करू शकता:

आयटी व सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट

बँकिंग आणि फायनान्स

तेल, गॅस आणि उर्जा

मेटल्स व माइनिंग

एफएमसीजी (जलद वापराच्या वस्तू)

टेलिकॉम

इन्फ्रास्ट्रक्चर आणि कन्स्ट्रक्शन

रिटेल

सिमेंट व बांधकाम साहित्य

ऑटोमोटिव्ह

फार्मास्युटिकल

विमानचालन आणि संरक्षण

औद्योगिक व उत्पादन

केमिकल

मीडिया, मनोरंजन आणि शिक्षण

शेती आणि संलग्न सेवा

कन्सल्टिंग

वस्त्रनिर्मिती

रत्न व दागिने

पर्यटन व आतिथ्य सेवा

आरोग्यसेवा

3. पात्रता व वयोमर्यादा काय आहे?

वय: 21 ते 24 वर्षे (अर्जाच्या अंतिम तारखेनुसार)

सध्या कोणत्याही पूर्णवेळ शिक्षण किंवा नोकरीत नसलेले

शिक्षण: किमान 10वी, 12वी, डिप्लोमा किंवा पदवी (BA, B.Sc, B.Com, BBA, BCA, B.Pharma इ.)

4. कोण अर्ज करू शकत नाही?

21 वर्षांखालील किंवा 24 वर्षांवरील उमेदवार

जे सध्या पूर्णवेळ शिक्षण किंवा नोकरीत आहेत

IIT, IIM, IIIT, NLU, IISER, NID यांसारख्या संस्थांमधून पदवीधर

CA, CMA, CS, MBBS, BDS, MBA, PhD किंवा अन्य मास्टर्स पदवीधारक

जे आधीपासून केंद्र/राज्य सरकारच्या इतर इंटर्नशिप/ट्रेनिंग योजनांमध्ये सहभागी आहेत

जे आधी NATS/NAPS अंतर्गत प्रशिक्षण घेतले आहे

कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹8 लाखांपेक्षा जास्त

कुटुंबातील सदस्य (पालक/स्वतः/पत्नी-पती) शासकीय कायमस्वरूपी कर्मचारी असतील (ठेकेदार कर्मचारी वगळता)

5. अर्जासाठी कोणते कागदपत्रे लागतील?

आधार कार्ड

शैक्षणिक प्रमाणपत्रे (फायनल परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र)

टीप: आधारमधील माहिती बदलता येणार नाही. इतर माहिती संपादित करता येईल.

6. अर्ज कसा करायचा?

1. https://pminternship.mca.gov.in या वेबसाइटला भेट द्या

2. ‘Register’ लिंकवर क्लिक करा

3. आवश्यक माहिती भरून सबमिट करा

4. पोर्टलद्वारे तुमचे रेसुमे तयार होईल

5. तुम्हाला आवडणाऱ्या 5 इंटर्नशिपसाठी अर्ज करा

6. अर्ज सबमिट करून कन्फर्मेशन पृष्ठ डाउनलोड करा

7. त्याची प्रिंट घ्या

7. योजनेची सुरुवात व शेवटची तारीख काय आहे?

सरकारने अद्याप दुसऱ्या फेरीसाठी तारीख जाहीर केलेली नाही. मात्र, मीडिया रिपोर्टनुसार दुसरी फेरी 1 ऑगस्टपासून सुरु होऊ शकते.

8. आरक्षण किंवा वयोमर्यादेमध्ये सूट आहे का?

नाही, पण विविधता आणि समावेशकतेला प्राधान्य देण्यात येते. कंपन्या स्वतःच्या निकषांनुसार निवड करतात.

9. लॉगिन कसे करावे?

नोंदणीवेळी सेट केलेल्या Username व Password ने लॉगिन करता येईल.

10. मानधन किती मिळेल?

दरमहा ₹5,000

₹500: कंपनीकडून

₹4,500: सरकारकडून थेट आधारशी लिंक असलेल्या खात्यावर DBT द्वारे

कालावधी: 12 महिने

11. इंटर्नशिप नंतर नोकरीची खात्री आहे का?

नाही. ही योजना नोकरीची हमी देत नाही. नोकरी मिळणे ही कंपनीच्या धोरणांवर व तुमच्या कामगिरीवर अवलंबून आहे.

12. एक वर्षानंतर पुन्हा अर्ज करता येतो का?

होय, जर एखादा उमेदवार इंटर्नशिपमधून बाहेर पडला असेल, तर एक वर्षानंतर तो पुन्हा अर्ज करू शकतो.

13. इंटर्नशिप दरम्यान मूल्यमापन केले जाईल का?

होय. कामगिरीच्या आधारे फीडबॅक, रिपोर्ट्स आणि पारितोषिक दिले जातील. “My Internship” विभागात “Quarterly Progress Report Feedback” टाईल खाली रिपोर्ट पाहता येईल.

14. इंटर्नशिप अर्धवट सोडल्यास काय?

जर उमेदवाराने इंटर्नशिप पूर्ण होण्याआधी सोडली, तर एक वर्षापर्यंत तो पुन्हा अर्ज करू शकणार नाही.

15. कोणत्या कंपन्या सहभागी आहेत?

उदाहरणार्थ:

रिलायन्स इंडस्ट्रीज

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS)

टाइम्स ग्रुप

ITC

हिंदुस्तान युनिलिव्हर

16. तक्रारी कुठे नोंदवाव्यात?

पोर्टलवरील ‘File a Grievance’ > ‘Add Grievance’ यामार्गे तक्रार नोंदवता येईल.
संपर्क:
📞 1800 11 6090
📧 pminternship@mca.gov.in

ही योजना सुशिक्षित पण बेरोजगार तरुणांसाठी एक उत्तम संधी आहे. जरूर नोंदणी करा आणि आपल्या करिअरसाठी पाऊल उचला!

 

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now
               
हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
डाउनलोड करें

जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Related Articles

Back to top button
Close