५० वा जिल्हास्तरीय स्काऊट गाईड व कब, बुलबुल जिल्हा मेळाव्याचे आश्रम शाळा वाघाळा येथे आयोजन.

नवीन नांदेड (प्रतिनिधी)-नांदेड भारत स्काऊटस् आणि गाईडस् जिल्हा कार्यालय नांदेड व जिल्हा परिषद शिक्षण विभाग, नांदेड यांच्या वतीने जिल्हास्तरीय ५० वा जिल्हा मेळावा दि. ४ ते ७ फेब्रुवारी २५ या कालावधीत महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा, वाघाळा नांदेड ता. जि. नांदेड येथे आयोजित करण्यात आलेला आहे. स्काऊट्स गाईडस ही निधर्मी, अराजकीय व गणवेषधारी सर्वात मोठी चळवळ आहे. ही चळवळ रान १९०७मध्ये इंग्लडमध्ये सुरु झाली असून आजमितीस जगातील २१० देशात सुरु आहे. या चळवळीच्या माध्यमातुन देशाचा भावी नागरीक सुजाण, सुसंस्कत, स्वावलंबी व आत्मनिर्भर घडावा यासाठी ही चळवळ सातत्याने कार्य करीत आहे. या चळवळीत जगातील चार कोटी पेक्षा जास्त युवक युवती सहभागी असून भारतातील ५५ लक्ष तर महाराष्ट्र राज्यात १५ लक्ष सदस्यांचा त्यात समावेश आहे. तसेच नांदेड जिल्हयातील ३५ हजार सदस्य आहेत. या चळवळीची मुलतत्वे लक्षात घेता महाराष्ट्र शासनाने सन १९७२ मध्ये या चळवळीतील अभ्यासक्रमाचा शालेय विषयांतर्गत समावेश केला. जिल्हा परिषद नांदेड मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्हायातुन १६ तालुक्यातून नांदेड तालुक्याला हा मान पंधराव्या वर्षी मिळाला असुन नांदेड तालुक्यातील महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक अश्राम शाळा वाघाळा येथे ४ ते ७ फेब्रुवारी २५ या कालावधीत महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक अश्राम शाळा वाघाळा नांदेड ता. जि. नांदेड येथे ५० वा स्काऊट गाईड जिल्हा मेळावा आयोजन करण्यात आले असून या मेळाव्यात नांदेड जिल्हयातील २५०० हजार विध्यार्थी सहभागी होत आहेत. सहभागी विध्यार्थ्यांसाठी आयोजकां द्वारे निवास व त्या अनुषंगाने लागणा-या भौतिक सुविधा मोफत पुरविल्या जाणार आहेत. या जांबोरीत साहसी व आनंदमयी खेळ, राज्यांतील खादय संस्कती, सांस्कृतिक देवाणघेवाण विचारांची देवाणघेवाण, समुदाय विकास उपक्रम, संचलन व शिस्त, कॅम्प क्राप्ट, कॅम्प फायर, पायोनियरिंग प्रकल्प, शारीरीक कसरती, लोकनत्य, बॅन्ड पथक, इत्यादी उपक्रम राबविले जाणार आहेत. शिक्षणाधिकारी प्राथमिक डॉ. सविता बिरगे, माध्यमिक माधव सलगरे यांनी जास्तित जास्त विदयार्थ्यांनी सहभाग नोंदविण्या करीता आवाहन केले आहे. स्काऊट गाईड मेळाव्यासाठी जिल्हा संघटक जनार्दन ईरले, जिल्हा गाईड संघटक शिवकाशी तांडे, जिल्हा चिटणीस गंगाधर राठोड, मेळावा प्रमुख रवी ढगे, व स्काऊट गाईड प्रशिक्षण आयुक्त भागिरथी बच्चेवार, आयोजक मुख्याध्यापक भगवानराव इंगेवाड् तसेच आडवांस पार्टी मधील सदस्य श्री रमेश फुलारी सर ,विनोद सोनटक्के सर, भेंडे सर, टी, डी, गायकवाड सर, वाकोडे सर, तोरणेकर सर, इत्यादींचा मोलाचा वाटा या ठिकाणी नोंदवण्यात आलेला आहे

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now
               
हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
डाउनलोड करें

जवाब जरूर दे 

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Back to top button
Close